लॉक डाऊन काळा नंतर जवळपास दोन महिन्यांनी बेळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन होणाऱ्या बेळगाव बंगळुरू पॅसेंजर ट्रेनसाठी गुरुवारी बेळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची स्वच्छता करण्यात येत आहे.
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी प्रायोगिक तत्वावर बेळगाव बंगळुरू ही रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती त्या नुसार बेंगलोर – बेळगाव रेल्वे बेंगलोर येथून सकाळी 8:00 वाजता सुटून बेळगाव येथे सायंकाळी 6:30 वाजता पोहोचणार आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या विनंतीला मान देऊन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणाऱ्या या रेल्वे गाड्यांसाठी प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंग करावे लागत आहे. त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान कोरोना संदर्भातील मास्कसह स्वच्छतेच्या आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे काटेकोर पालन करावे लागणार आहे त्या नुसार बेळगाव रेल्वे स्टेशनचे प्लॅट फॉर्म देखील सॅनिटाइज केले जात आहेत.