दूध ही अत्यावश्यक व प्राथमिक गरज आहे. लहानांपासून मोठया पर्यन्त सर्वांना दुधाची गरज लागते. दूध हा अति नाशवंत पदार्थ आहे त्याचे योग्य वेळी वितरण व शीतकरण करणे गरजेचे आहे. यासाठी डेअरी उद्योजक व दुध वहातुक करणाऱ्याना दुधाचे नियोजन वेळच्यावेळी करावे लागते.दूध हे पहाटेचे लोकांच्या पर्यंत पोहोचवणे गरजेचे असते. त्यामुळे शासनाने घेतलेला रात्री 7 ते सकाळी 7 कुणीही घरा बाहेर पडू नये हा निर्णय दूध व्यावसायिकांसाठी अडचणींचा आहे.
दूध नियोजन करताना त्यांना रात्री घराबाहेर पडावेच लागते बेळगावातील अश्या डेअरी व्यवसायिकांकडे पासही आहेत पण शहापूर पोलीस स्थानक परिसरातील काही पोलीस दूध व्यावसायिकाना अडवत आहेत.
त्यामुळे दूध व्यवसायीकांची गोची झाली आहे. दिवसभर मद्यपींची सोय करणाऱ्या दारू व्यवसायिकांना पोलीस संरक्षण पुरवून दारू धंदा करण्याचा अनोखा मार्ग पोलिसांनी निर्माण करून दिला आहे. आणि दुधा सारख्या अमृततुल्य गोष्टींचा व्यापार करणाऱ्यांना मात्र धाक दाखवला जात आहे. याची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी.
पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेला प्रथम कशाची गरज आहे हे समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दूध व्यावसायिकांना त्यांचे पास पाहून मुभा देण्याची गरज आहे.