कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर शिनोळी येथे असलेल्या चेकपोस्ट कुद्रेमानी रुग्णांची व ग्रामस्थांची अडवणूक केली जात आहे अशी तक्रार येताच जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील चेक पोस्ट मधून कुद्रेमानी ग्रामस्थांना सोडा अशी मागणी केली होती जिल्हाधिकारी डॉ बोमनहळळी यांनी पाटील यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता त्यानंतर शनिवारी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी कुद्रेमानी सह चंदगड तालुक्यातील गरजू लोकांना विशेषतः रुग्णांना सोडा अशी मागणी दोन्ही राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.
तुरमुरी आणि शिनोळी या कर्नाटक,महाराष्ट्र सीमेवरील चेक पोस्टला आमदार अनिल बेनके यांनी भेट देऊन पाहणी केली.कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर पोलीस खात्याने चेक पोस्ट लॉक1 डाऊन सुरू झाल्यापासून उभारल्या आहेत.
बेकायदा प्रवेश रोखण्यासाठी दोन्ही राज्यांनी हे पाऊल उचलले आहे.लॉक डाऊन शिथिल झाल्यावर अनेकजण बेकायदा प्रवेश करतात हे ध्यानात घेऊन चेक पोस्ट उभारल्या आहेत.चेक पोस्टवर अडवणूक केली जाते अशा तक्रारी आल्यामुळे आमदार बेनके यांनी दोन्ही चेक पोस्टला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
बेकायदेशीररीत्या येणाऱ्यांना अडवण्यासाठी चिरमुरी आणि शिनोळी येथे चेक पोस्ट महाराष्ट्र आणि कर्नाटकने उभारल्या आहेत. या चेक पोस्टवर अडवले जाते अशी तक्रार करण्यात आली होती म्हणून येथे भेट देऊन दोन्ही राज्याच्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चां केली आहे.दररोज चंदगडहून बेळगावला आणि बेळगावहून चंदगडल जीवनावश्यक वस्तूंची ने आण केली जाते.जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना ,रुग्णवाहिकेला अडवू नका अशा सूचना चेक पोस्टवर केल्या आहेत.या बाबत त्यांनी अडवले जाणार नाही असे आश्वासन दिले आहे असे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.आपला मतदारसंघ नसताना केवळ रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून उत्तर आमदारांनी चेक पोस्टची पहाणी केली आहे.