Sunday, November 17, 2024

/

हेस्काॅमचा सावळा गोंधळ : घरगुती विज बिल तब्बल 59 हजार रुपये

 belgaum

हुबळी इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी लिमिटेड अर्थात हेस्काॅमकडून नाथ पै चौक शहापूर येथील एम. एम. होनगेकर यांना तब्बल 59 हजार 178 रुपयांचे घरगुती विजेचे बिल देण्याचा प्रकार घडला आहे. आपली ही चूक हेस्कॉमने नंतर निस्तरली असली तरी अशाप्रकारे नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठविण्याचे प्रकार सुरूच असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नाथ पै सर्कल शहापूर येथील रहिवासी एम. एम. होनगेकर यांच्या घराचे वीजबिल दरवेळी जेमतेम 400 ते 425 रुपयापर्यंत येत असते. मात्र गेल्या 10 मार्च 2020 ते 10 मे 2020 या दोन महिन्याच्या कालावधीतील विजेचे बिल जेंव्हा होनगेकर यांच्या हाती आले, तेंव्हा त्यांना धक्काच बसला. कारण बिलाचा आकडा होता तब्बल 59,178 रुपये. यासंदर्भात विचारणा करून देखील कोणीही दाद देत नसल्यामुळे होनगेकर यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडे धाव घेतली.

Hescom bill
Hescom bill

युवा समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यानंतर संबंधित हेच काम अधिकाऱ्यांची भेट घेऊन घडल्या प्रकाराबद्दल जाब विचारला. चौकशीअंती आपल्या कर्मचाऱ्यांकडून चूक झाल्याचे लक्षात येताच हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी एम. एम. होनगेकर यांचे विज बिल दुरुस्त करून दिले.

याबद्दल होनगेकर यांनी म. ए. युवा समितीला धन्यवाद दिले आहेत. दरम्यान, विजेचे बिल अव्वाच्या सव्वा येण्याचे हे प्रकार अलीकडे सातत्याने घडत असून असा प्रकार निदर्शनास येतात नागरिकांनी युवा समितीचे श्रीकांत कदम यांच्याशी   संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.