राज्यातील ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये दारू विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर बेळगाव जिल्ह्यात 6 कोटी 46 लाख रुपये इतक्या किंमतीच्या बियरसह भारतीय बनावटीच्या विदेशी दारूचा खप झाला असल्याची माहिती बेळगाव अबकारी खात्याचे संयुक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांनी दिली.
बेळगाव येथील अबकारी मुख्य खात्याच्या कार्यालयात मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव अबकारी खात्याचे जॉईंट कमिशनर अर्थात संयुक्त आयुक्त वाय. मंजुनाथ पुढे म्हणाले की, लॉक डाऊनच्या कालावधीत राज्यात बंद असलेली दारू विक्री काल सोमवार 4 मे पासून कंटेनमेंट वगळता अन्य प्रदेशात सुरू करण्यात आली आहे.
बेंगलोर येथे मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत असल्यामुळे सध्या राज्यातील दारू विक्रीचा निश्चित आकडा सांगता येणे शक्य नाही. तथापि बेळगाव जिल्ह्यात काल दिवसभरात 1 लाख 35 हजार लिटर भारतीय बनावटीच्या विदेशी दारूची विक्री झाली आहे. त्याचप्रमाणे 37 हजार लिटर बिअरचा खप झाला आहे. याची एकूण किंमत 6 कोटी 46 लाख रुपये इतकी होते असे मंजुनाथ यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे लॉक डाऊनच्या काळात दारूशी संबंधित आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध 132 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी 67 आरोपींना गजाआड करण्यात आले असल्याची माहितीही जॉईंट कमिशनर वाय. मंजुनाथ यांनी दिली.
आला अधिकृत आकडा… बेळगावात सोमवारी एका दिवसांत मद्य प्रेमींनी खरेदी केली 6 कोटी 46 लाखांची दारू-अबकारी खात्याचे जॉईंट कमिशनर वाय मंजुनाथ यांची माहिती पहा खालील व्हीडिओ
#belgaumexisedepartment
#ymanjunathjointcoommissinor
#belgaumleakersale
#belgaumLive
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1100135847010674&id=375504746140458