शहरात पी – 974 क्रमांकाची गर्भवती महिला कोरोना बाधित आढळून आल्यानंतर तबलीग मरकज नवी दिल्ली आणि अजमेर कनेक्शननंतर आता कोरोनाचे मुंबई – बेळगाव कनेक्शनही सिद्ध झाले आहे. सदाशिवनगर येथील संबंधित 27 वर्षीय महिला मुंबई येथून बेळगावात आली होती. सदर महिला कोरोना बाधित आढळून आल्यामुळे आता 23 दिवसानंतर कोरोनाने पुन्हा बेळगाव मनपा हद्दीत प्रवेश केला आहे.
सदाशिवनगर येथील कोरोना बाधित आढळून आलेली पी 974 क्रमांकाची 27 वर्षीय महिला ही सात महिन्याची गर्भवती आहे. त्यामुळे तिचे काॅरन्टाईन करण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी तिचे स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेत कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 108 वर पोहोचली आहे.
बेळगाव महानगर पालिका हद्दीत आतापर्यंत आढळून आलेली ही आठवी कोरोना बाधित रुग्ण आहे. यापूर्वी कॅम्प, अमननगर, आझाद गल्ली व संगमेश्वरनगर याठिकाणी एकूण 7 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. गेल्या 21 एप्रिल रोजी आझाद गल्ली येथे हे कोरोनाग्रस्त महिला सापडल्यानंतर आतापर्यंत शहरात एकही नवा कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र आता 23 दिवसानंतर कोरोना विषाणूने पुन्हा बेळगाव महानगरपालिका व्याप्तीत प्रवेश केला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते सतर्क झाले असून लवकरच सदाशिवनगर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला जाण्याची शक्यता आहे.
सदाशिवनगर येथे हे नव्याने कोरोनाबाधित आढळून आलेली पी – 974 क्रमांकाची गर्भवती महिला मोठ्या घराण्यातील असून आता तिच्या घरच्यांनाही काॅरन्टाईन करण्यात आले आहे. गेल्या 3 मे रोजी ही पी – 974 क्रमांकाची महिला मुंबईहून बेळगावला आली होती.
कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीवरील चेक पोस्टच्या ठिकाणी डोळ्यात धूळफेक करून सदर महिलेला बेकायदेशीररित्या बेळगावात आणण्यात आले असल्याचे समजते. यासाठी पी 974 क्रमांकाच्या सदर महिलेच्या कर्नाटकातील प्रवेशास कारणीभूत असलेला तिचा भाऊ आणि कार चालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
How that lady reached Belagavi fooling many check posts?How 6 people reached Goa boundary from Mumbai? 28 people were cought at Nipani check post ? don’t you think that something fishy going on in many check posts.