बेळगाव जिल्ह्यात एकूण 73 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अनेकांना धास्ती लागून राहिली होती. मात्र आता काही रुग्ण बरे होऊ लागले आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी हा आकडा शून्यावर कसा येईल याकडेच साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
सोमवारी 11 रुग्ण बरे झाले आहेत तर बरे होणाऱ्यांची संख्या एकूण 26 वर जाऊन पोचले आहे. हिरेबागेवाडी येथील एका 80 वर्षीय तिचा मृत्यू झाला आहे. तर 73 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अजूनही काही रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. मात्र रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असल्याने हा आकडा शून्यावर येऊन पोहोचल्यानंतर सर्वांना दिलासा मिळणार आहे.
संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्याला बेळगाव अपवाद नाही. मात्र बेळगावात कोरोना बाधित बरे होऊ लागल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. विशेष करून डॉक्टर नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना रुग्ण बरे होत असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढले आहे. अजूनही कसोशीने रुग्ण बरे करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा इस्पितळाच्या सुत्रांनी देखील लवकरच आणखी रुग्ण निगेटिव्ह येणार असल्याचे सूतोवाच्य केलेले आहे त्यामुळे जनतेच्या नजरा कधी बेळगाव कोरोनामुक्त होणार याकडे लागल्या आहेत.लॉक डाऊन मुळे अनेक जण घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळेच कोरोनावर मात करण्यास डॉक्टर यशस्वी ठरत आहेत. बेळगावातील एकूण 26 रुग्ण बरे झाले आहेत. अजूनही अनेकांचे रिपोर्ट निगेटिव येणार आहे. मंगळवारीही काहीजण निगेटिव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी 73 चा आकडा शून्यावर कसा येईल याकडेच साऱ्यांचे नजरा लागून राहिले आहे.