बेळगाव एपीएमसीमध्ये नव्याने भाजी मार्केट सुरू करण्यात आले. त्या ठिकाणी सुरळीत खरेदी-विक्री ही सुरू झाली. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे ही गर्दी पाहून एपीएमसी प्रशासनाने तीन ठिकाणी भाजी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यातील अलारवाड क्रॉस जवळील भाजी मार्केटचे शेड कोसळल्यानंतर इथले देखील व्होलसेल मार्केट बंद झाले मात्र या ठिकाणी सुरू झालेल्या किरकोळ भाजी मार्केट मध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुरक्षित अंतराची ऐशी की तैसी असाच प्रकार निदर्शनास येऊ लागले आहे.
सकाळी सात ते दहा या वेळेत भरणाऱ्या या बाजारात गर्दी होत आहे पूर्व भागातील शेतकरी मोठया संख्येने भाजी विक्री करण्यासाठी जमत आहेत शहापूर भागातील लोक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात इथे पोहचत आहेत परिणामी मोठी गर्दी होत आहे.
हिरेबागेवाडी जवळील आसपासच्या गावातील शेतकरी इथे भाजी विक्रीसाठी येत आहेत त्यामुळे हे मार्केट देखील धोक्याचे बनत चालले आहे.एपीएमसी प्रशासनाने घेतलेला निर्णय हा योग्य असला तरी नागरिकांनीही त्याची अंमलबजावणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. बी एस येडीयुराप्पा मार्ग हलगा येथे सकाळी साडेसहा वाजता भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. त्या ठिकाणी सुरक्षित अंतराला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे आता प्रशासनही हतबल झाले आहे.
बी एस येडीयुरप्पा मार्ग हलगा येथे मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेत्यांनी आपला तंबू ठोकला आहे. मात्र त्या ठिकाणी भाजी खरेदीसाठी गर्दी उसळत आहे. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांना मूठमाती देण्यात आल्याचे दिसून येत आहे. याबाबत आता गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. एपीएमसी प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य होता. मात्र नागरिकांना अजूनही कोरोनाबाबत धास्ती नसल्याचे दिसून येत आहे. बी एस येडीयुराप्पा मार्ग हलगा येथे सकाळी साडेसहा वाजता किरकोळ भाजी विक्रेत्यांकडे प्रमाणात गर्दी उसळली होती. त्या ठिकाणी सुरक्षित अंतराला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे आता प्रशासनही हतबल झाले आहे. भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र त्या ठिकाणी सुरक्षित अंतर न ठेवल्याने धास्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्रवारी जिल्ह्यात अकरा रुग्ण आढळले आहेत.
यामधील दहा रुग्ण हिरे बागेवाडीचे आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा बेळगाव जिल्हा लॉक डाऊन करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असताना नागरिकांनी मात्र याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसून येत आहे. ही गर्दी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आता पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.