संपूर्ण देशातच लॉक डाउन असल्यामुळे अनेक कामगारांना तसेच गोरगरिबांना मोठा फटका बसला आहे. याला बेळगावही अपवाद नाही. मात्र आणखी पंधरा दिवस सहकार्य करा अशी कळकळीची विनंती एसीपी एन व्ही बरमनी यांनी केली आहे.
नुकतीच बेळगाव लाईव्हशी खास मुलाखत घेतली आहे. या खास मुलाखतीत त्यांनी वरील आवाहन केले आहे. पोलिसांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही काठी उचलली आहे. मात्र जनताच बाहेर पडत असल्याने आम्हालाही काय सांगावे समजत नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे आणखी पंधरा दिवस नागरिकांनी सहकार्य केल्यास या रोगावर मात करू शकतो असे त्यांनी सांगितले आहे.
सध्या पोलीस प्रशासन डॉक्टर्स नर्स आशा अंगणवाडी कार्यकर्त्या यांनी 24 तास काम केले आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव तालुक्यातील हिरे बागेवाडी आणि रायबाग तालुक्यातील कुडची येथे मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही संख्या येत्या पंधरा दिवसात कमी करण्यासाठी डॉक्टर यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे थोडासा धीर धरून घराबाहेर पडू नका असे आवाहनही बरमणी यांनी केले आहे.
सध्या पोलिसावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला सांगून घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र याकडे काही नागरिक दुर्लक्ष करत आहे. सध्या अनेक व्यवहार बंद आहेत. मात्र नागरिकांनी केलेले सहकार्य मोलाचे आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य करण्यात आले आहे त्याच पद्धतीने नागरिकांनी यापुढेही आणखी पंधरा दिवस सहकार्य करावे असे आवाहन देखील यांनी केले आहे.