Wednesday, January 29, 2025

/

राजस्थानहुन बेळगावला परतलेले विद्यार्थी क्वारंटाइन

 belgaum

राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या बेळगाव आणि परिसरातील दीडशे विद्यार्थ्यांना चार खासगी बसमधून बेळगावला आणण्यात आले.आयआयटी,इंजिनियरिंग आणि मेडिकल कोचिंगसाठी बेळगावातील दीडशेहून अधिक विद्यार्थी कोटा येथे प्रशिक्षण घेत होते.

लॉक डाऊन झाल्यामुळे विद्यार्थी देखील परराज्यात घाबरले होते आणि त्यांचे पालक देखील टेन्शनखाली होते.हजारो मैल दूर आपली मुले काय करत असतील ही चिंता पालकांना सतावत होती.कोरोनाची भीती तर होतीच.त्यामुळे कर्नाटक सरकारने राजस्थान सरकारशी संपर्क साधून कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना बेळगावला आणण्याची व्यवस्था केली.

कोटा येथे वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र देऊन पोलीस बंदोबस्तात या विद्यार्थ्यांना बेळगावला आणण्यात आले.बेळगावला पोचल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.दोन दिवस सतराशे किलोमीटरचा प्रवास करून हे विद्यार्थी बेळगावला दाखल झाले.बेळगाव,गोकाक,विजापूर येथील हे विद्यार्थी आहेत.त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.