बेळगावात कोरोना बाधित तीन रुग्ण पोजिटिव्ह आढळून आल्यावर अख्ख बेळगाव खडबडून जागे झालं. आता पर्यंत बेळगावकरानी ‘लाईटली’ घेतलेला कोरोना आपल्या दाराशी आलेला समजल्यावर शहर व तालुक्यातील नागरिकांनी गल्ल्याच बंद केल्या, आणि बेळगाव कडक बंद झालं.
ही बेळगावकरांची वृत्ती कोरोना विरुद्ध लढाई लढताना खूप उपयोगी पडणार आहे. गल्ल्या बंद झाल्या रस्ते अडवले गेले अख्या बेळगावचीच नाका बंदी झाली, पण शासकीय यंत्रणेला बंदोबस्तासाठी व जनतेच्या आपत्कालीन सेवेसाठी असे रस्ते बंद ठेवता येत नव्हते म्हणून पोलीस आयुक्तांनी रस्ते उघडे करण्याचा निर्णय घेतला.
जनतेने दृढ मानसिकतेतुन गल्ली बंद स्वीकारलच आहे, आता त्याचा पुढचा भाग म्हणून रस्ते जरी उघडे झाले असले तरी नागरिकांनी घरचे दरवाजे बंद करण्याचा उपक्रम चालू ठेवला पाहिजे जेष्ठ लोकांनी अधिकाराने लहानांना घराबाहेर पाऊल ठेवायला देता कामा नये, अन जेष्ठ लोकांनी आत्मनियमन करून कारणाविना रस्त्यावर येणे टाळले पाहिजे.
गल्लीतील पंच मंडळी, युवक मंडळांनी या सर्वांवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे. पंचांनी योग्य अश्या भाजीच्या गाडीची निवड करून ठराविक वेळेत गल्लीत बोलावून भाजीची सोय करून द्यावी.मोफत दुधाच्या गाड्या देखील येत आहेत त्याच्या भोवती गर्दी न करता गरीब लाभार्थीना त्याचा फायदा करून द्यावा आज खरं तर या वेळेला पंच मंडळी व युवक मंडळाच्या जाणत्या कामाची समाजाला गरज आहे.
प्रत्यक्षात गल्ली बंद न करता मनातून गल्ली बंद करा,अनावश्यक घरा बाहेर जाणे टाळा वेळेचे नियोजन करून खरेदी करा केवळ गरजू अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करा पंच मंडळींचे म्हणणे ऐका,कोणत्याही कार्यात शहर परिसरातील युवक मंडळ हिरीरीने भाग घेतात अनेक उपक्रम त्यांनी यशस्वी करून दाखवलेत ‘युवकानो आपली गल्ली वाचवा’-