Friday, December 20, 2024

/

जिल्ह्यात सहा कंटमेंट झोन-येळ्ळूर संकेश्वर सील-डी सी यांची बैठक

 belgaum

जिल्ह्यात 36 कोरोना पोजिटिव्ह आढळल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी तातडीची बैठक बोलावून अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या आहेत. जिल्ह्यात पसरत चाललेल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी कडक उपाय योजना करा कोरोनाच्या बाबतीत कोणताही दुर्लक्षपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी बैठकीत दिला आहे.

घरोघरी जावून तपासणी करून त्याचा अहवाल दोन दिवसात सादर करा असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळ्ळी यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार याच्या बैठकीत बजावला.जिल्हाधिकाऱ्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी संवाद साधला.

Yellur seal
Yellur seal containtment zone

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही याची काळजी घ्या.आवश्यक तेथे उपचारासाठी पीपीई किट खरेदी करा.तालुक्यांना निधी देखील देण्यात आला आहे.लॉक डाऊन अंमलबजावणी काटेकोरपणे करा.संशयास्पद रुग्ण आढळला तर कोरोन्टीन करा.त्याचा अन्य व्यक्तीशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्या.जिल्हयात आजपर्यंत सहा कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.

येळ्ळूर आणि संकेश्वर गावच्या सीमा सील करण्यात आले आहेत.या गावातून कोणीही बाहेर जायचे नाही आणि बाहेरून आत यायचे नाही.घराबाहेर कोणीही पडणार नाही याची काळजी घ्या.कंटेनमेंट झोन मधील प्रत्येक घरी जावून सगळ्याची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.