लॉक डाऊन संपल्यावर 4 मे पासून उद्यमबाग आणि अन्य औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी उद्योजकांनी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली.फौंड्री क्लस्टर येथे पार पडलेल्या बैठकीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी,अनिल बेनके,नोडल अधिकारी राजेंद्र चोळन ,जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी ,पोलीस आयुक्त लोकेशकुमार आणि उद्योजक उपस्थित होते.
लॉक डाऊन नंतर सरकारच्या मार्गसुची प्रमाणे उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यास अनुमती दिली जाईल.उद्योजकांच्या मागणिबाबत राज्य सरकारशी संवाद साधणार आहे.कामगारांचे आरोग्य,भोजन आदी व्यवस्था उद्योगाजकांनी करायची आहे असे मंत्री सुरेश अंगडी म्हणाले.
कामगार लॉक डाऊन झाल्यावर गावाला गेले आहेत.ते परत केव्हा येतात बघायला पाहिजे.अनुभवी कामगार मिळणे अवघड होणार आहे.कंटेन्मेंट झोनपासून उद्यमबाग दूर असल्यामुळे उद्योग सुरू करायला परवानगी देणे आवश्यक आहे.कामगारांना पास तसेच उद्योगांना लागणारा कच्चा माल पुरवठा करण्याची व्यवस्था करावी लागेल अशी मागणी उद्योजकांनी केली.
During these difficult time I get lot information Thanks