Sunday, December 22, 2024

/

क्वारंटाइन म्हणजे काय?

 belgaum

करोनाचा अटकाव करण्यासाठी क्वारंटाइन हा उत्तम असा खबरदारीचा उपाय आहे. क्वारंटाइनमुळे करोना विषाणूचा प्रसार रोखता येतो, असे तज्ज्ञ सांगतात. क्वारंटाइनम्हणजे करोनाच्या संशयिताला १४ दिवस वेगळे ठेवणे. यात काय काळजी घ्यावी लागते पाहा.
होम क्वारंटाइनचा अर्थ आहे घरामध्ये इतरांपासून स्वत:ला वेगळे ठेवणे. तुम्हाला करोनाची लागण झाल्याचा संशय असल्यास किंवा तुम्हाला सर्दी, खोकला, ताप असल्यास तुम्ही स्वत:ला एका वेगळ्या खोलीत सर्वांपासून अलग राहायला हवे. असे केल्याने तुमच्या घरातील इतर सदस्यांना विषाणूचा संसर्ग होणार नाही.
क्वारंटाइन हा मूळ लॅटीन शब्द आहे. याचा अर्थ होतो ४० दिवसांचा कालावधी. त्याचा अर्थ अलग राहणे, विलगीकरण, किंवा अलग राहणे किंवा किनाऱ्याजवळ येण्याला मज्जाव (जहाजासंदर्भात) असा होतो. यासाठी रुग्णालयात वेगळी खोली देण्यात येते.
खरे तर, जुन्या काळात जहाजांमध्ये एखाद्या प्रवाशाला एखादा आजार झाल्यास जहाजावरील मालावर विषाणू पसरण्याचा धोका असायचा. असा संशय असलेल जहाज ४० दिवस किनाऱ्यापासून दूर ठेवले जायचे.
ब्रिटनमध्ये प्लेगच्या साथीला पायबंद घालण्यासाठी अशा प्रकारच्या व्यवस्थेची सुरुवात झाली.
घरात कसे करू शकतो स्वत:ला क्वारंटाइन :-
होम क्वारंटाइनसाठी एक हवा खेळती राहिल अशी खोली हवी, यात टॉयलेटही असावे. त्याच खोलीत आणखी कुणी असेल तर त्यांच्यामध्ये १ मीटर इतके अंतर असावे. दोन्ही व्यक्तींनी घरातील वृद्ध आणि गरोदर स्त्रिया, तसेच मुलांपासून दूर राहावे. संशयित रुग्णाने कोणताही समारंभ, लग्न, पार्टी अशा कार्यक्रमांमध्ये १४ दिवस किंवा पूर्ण बरे होईपर्यंत जाणे टाळावे. साबणाने हात धुवावेत. ७०% अल्कोहोल असलेल्या चांगल्या हँड सॅनिटायझरचा वापर करावा. घरामध्ये पाणी, भांडी, टॉवेल आणि इतर गोष्टींना स्पर्श करू नये. सर्जिकल मास्क लावून राहा. दर ६ ते ८ तासांनी मास्क बदला त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करा
1.घरात स्वत:ला वेगळे ठेवून विषाणूचा प्रसार रोखता येतो का? घरात स्वत:ला वेगळे ठेवल्याने आणि काळजी घेतल्याने करोवा विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात रोखता येतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर तुम्हाला संशय आला की आपल्याला करोनाची लागण झाली असावी तर तुम्ही स्वत:ला घरात १४ दिवस क्वारंटाइन करू शकता
2. कोणाला स्वत:ला क्वारंटाइन करण्याची गरज भासते? करोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेली व्यक्ती, किंवा ज्याच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसतात अशा व्यक्तीने स्वत:ला घरात क्वारंटाइन करायला हवे. या विषाणूची लागण झाल्यानंतर या आजाराची लक्षणे दिसण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी लागतो. अशात तुम्ही निष्काळजीपणी दाखवलात तर शेकडो लोकांना लागण होण्याचा संभव असतो.
3.घरात क्वारंटाइन राहिलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वाच्या सूचना काय आहेत? घरातील एकाच व्यक्तीने क्वारंटाइन राहिलेल्या व्यक्तीची देखभाल करावी. अशा व्यक्तीच्या त्वचेशी थेट संपर्क करू नका. घराची साफसफाई करताना हँडग्लोव्हज घाला, ते काढून टाकल्यानंतर हात स्वच्छ धुवा. घरात बाहेरच्या व्यक्तींना येऊ देऊ नका. क्वारंटाइन राहिलेल्या व्यक्तीमध्ये लक्षणे आढळल्यास १४ दिवस निकटचा संपर्क करू नका. तिचा रिपोर्ट निगेटीव्ह येईपर्यंत ही काळजी घ्या. क्वारंटाइन राहिलेल्या व्यक्तीच्या खोलीतील लादी, तसेच इतर सामान एक टक्का सोडियम हायपोक्लोराइट सोल्यूशनने स्वच्छ करा. या व्यतिरिक्त टॉयलेट देखील रोज रेग्युलर हाऊसहोल्ड ब्लीचने स्वच्छ करा

आर्टिकल सौजन्य-डॉ सोनाली सरनोबत बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.