Saturday, December 21, 2024

/

जेंव्हा उद्यमबाग चार्ली एक्शन मोडवर येतात…

 belgaum

उद्यमबाग पोलीस स्थानकाचे सीपीआय दयानंद शेगुणशी यांच्यावर लॉक डाऊन कालावधीत मोठी जबाबदारी पडली असून ती ते समर्थपणे पार पाडत आहेत . बेळगाव शहराचे प्रवेशद्वार असलेल्या तिसऱ्या रेल्वे गेट परिसरात सकाळपासूनच ते वाहने तपासणे .वाहने माघारी पाठवणे आणि वाहने जप्त करणे ही जबाबदारी ते आपल्या सहकाऱ्या समवेत पार पाडतात .

त्याशिवाय बाहेरून येणारी संशयास्पद वाहने तपासण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे . बाहेरून येणारी संशयास्पद वाहने आणि त्यातून येणाऱ्या व्यक्ती यांची सखोल चौकशी,तपासणी करूनच मग सगळे योग्य वाटले तरच त्या वाहनाला आणि त्यामधील व्यक्तींना शहरात जाण्यास परवानगी दिली जाते . हे काम दिवसभर कंटाळता डोळ्यात तेल घालून शेगुणशी याना करावे लागते .

Udhyambag cpi
Udhyambag cpi

ड्युटी बजावत असताना माणुसकीचे भान ठेवून दवाखान्याला घेऊन जाणाऱ्या वाहनाला परवानगी देण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते . दिवसभर अन्य पोलीस कर्मचारी वाहने तपासणे ,ओळखपत्र तपासणे काम करत असताना सीपीआय दयानंद शेगुणशी आपण पोलीस वाहनात आराम बसून आदेश देत नाहीत तर त्याच्या समवेत ते देखील रस्त्यावर तासनतास थांबून सेवा बजावतात .

आजारी व्यक्ती,औषध आणायला जाणाऱ्या व्यक्ती,महत्वाच्या कामाला जाणाऱ्या व्यक्तींना ते पुढे जाण्यास माणुसकीच्या दृष्टिकोनातून परवानगी देतात .त्यामुळे ते लोक देखील माणुसकी जपणारे असे पोलीस अधिकारी हवेत अशी प्रतिक्रिया व्यक्त करतात .

1 COMMENT

  1. Hattsoff to Udyambag police n all police department. You all are real Corona Warriors. Really you all are doing great job.
    I pray God to keep safe n healthy to you all and your family members. Stay Safe. ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.