बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित यांची वाढती संख्या लक्षात घेऊन चंदगड तालुका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव तसेच हुक्केरी तालुक्याला जोडणारे आपले सर्व लहान मोठे 21 मार्ग सील केले आहेत. यासाठी कांही ठिकाणी रस्त्यावर चक्क चरी खोदण्यात आल्या आहेत.
सदर सील डाऊन करण्यात आलेल्या 21 मार्गांपैकी काही मार्गांवर चेक पोस्ट आहेत तर काही ठिकाणी डांबरी रस्ते 3 ते 5 फूट खोल चर काढून संबंधित रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यापैकी महत्त्वाचा म्हणजे बेळगाव ते वेंगुर्ला या आंतरराज्य महामार्गावर शिनोळी व कानूर येथे दगड-माती टाकून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
बाची ते शिनोळी, यळेबैल – सुरूते, राकसकोप – ढेकोळीवाडी, राकसकोप – तुडये, सोनोली – शिनोळी, अतिवाड – होसूर, हंदिगनूर – कुदनूर, कुरीहाळ – राजगोळी खुर्द, कुरीहाळ – दिंडलकोप, कुरीहाळ – चिकन फॅक्टरी आणि शिनोळी ते सोनोली हे बेळगाव तालुक्यातून चंदगड तालुक्याला जोडणारे रस्ते सील डाऊन करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी ग्रामस्थांनी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर चार ते पाच फूट खोल चर खोदून रस्ता बंद केला आहे.