एपीएमसी मार्केटमध्ये बुधवारी खरेदीदार आणि विक्रीदार यांची प्रचंड गर्दी झाली होती.हजारो दुचाकी वाहने एक किलोमीटर पर्यंत पार्किंग करण्यात आली होती.जिकडे पाहाल तिकडे रस्त्याशेजारी दुचाकी वाहनेच दिसत होती.
एपीएमसी मध्ये बुधवारी अधिक गर्दी असते.सध्या लॉक डाऊन असल्यामुळे आज अधिक गर्दी झाली होती.एपीएमसी गेटवर पोलीस बंदोबस्त आणि एपीएमसी कर्मचारी नेमण्यात आले आहेत.पण भाजी आणि अन्य कृषी उत्पादने घेऊन येणाऱ्यांनी आणि खरेदीदारांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे गेटच्या आत वाहने सोडणे पोलिसांनी बंद केले.
वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी दुचाकी वाहनावरून,चार चाकी वाहनातून विक्रीसाठी भाजी आणि अन्य साहित्य आणले होते.त्यामुळे हजारो दुचाकी वाहने एपीएमसीच्या एक किलोमीटर परिसरात पार्क करण्यात आली होती.