लॉक डाऊन चे उल्लंघन कोण करतंय याबाबत सध्या शहरातील विविध भागात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण ठेवले जात आहे.त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या भागात रस्त्यावर कोण येते यावर नजर ठेवली जात आहे त्यामुळे रस्त्यावर बाहेर फिरणाऱ्यावर ड्रोनने देखील नजर ठेवली जात आहे.
आता काही जण स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन पोलीस खात्याला मदत करत आहेत. स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरची यासाठी मदत होत आहे.13 ड्रोन कॅमेऱ्याद्वारे स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सेन्टर मधून नियंत्रण ठेवले जात आहे.

या ड्रोनची माहिती पोलीस खात्याला बंदोबस्तासाठी उपयुक्त ठरत आहे.या सेंटरच्या मधून मिळणारी माहिती पोलिसांना दिली जात आहे.त्यामुळे घरातच बसा, ड्रोनची नजर तुमच्यावर आहे.