बेळगाव- सोमवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी आणि बी टी पाटील उद्योग समूहाचे जेष्ठ व्यवस्थापक राजीव बी. कुलकर्णी यांच्या अंगडी कॉलेज समोर ,बेनकनहकळी हद्दीतील केएचबी कॉलनी शेजारी असलेल्या शेतातील घरात ठेवलेले सव्वा लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
केएचबी कॉलनीच्या शेजारी असलेल्या राजीव कुलकर्णी यांच्या शेताच्या चारी बाजूनी उंच असे पत्र्याचे कंपाउंड असून त्यालाही नेहमी कुलूप लावलेले असते. कंपाउंडच्या आत एक छोटेसे घर उभारलेले असून त्यामध्ये 85 हजार रुपये किंमतीचे साडेसात के. व्ही.चे डिझेल जनरेटर, 30 हजार रुपये किंमतीची कटिंग मशीन, साडेसात हजार रुपये किंमतीची 1 एचपी एलेक्ट्रिक मोटर आणि 4000 रुपये किंमतीचा कीटकनाशक फवारणी पंप अशा वस्तु ठेवण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी लॉकडाऊन काळात कुलूप तोडून आत प्रवेश करून या चारही वस्तू लांबविल्या असून तिथे असलेल्या झाडांचे आंबे व इतर फळेही लांबविली आहेत.
लॉक डाऊन कुलकर्णी महिनाभर आपल्या शेताकडे गेले नव्हते. काल शनिवारी लॉक डाऊनमध्ये थोडीशी शिथीलता मिळाल्याने राजीव कुलकर्णी यांनी शनिवारी सकाळी म्हणजे सुमारे एक महिन्यानंतर शेताला भेट दिली असता त्यांना चोरीचा हा प्रकार लक्षात आला. लागलीच त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.