गुरुवारी दुपारी झालेल्या वळीव पावसाच्या दरम्यान आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने तात्पुरता उभे केलेले व्होलसेल भाजी मार्केटचे शेड कोसळले असून यात शेड मध्ये आसरा घेतलेले अनेक व्यापारी दलाल व हमाल किरकोळ जखमी झाले आहेत तर एका हमालाच्या हाताला पत्रा लागून गंभीर दुखापत झाली आहे.
गुरुवारी दुपारी साडे तीन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून जखमी हमलास उपचार करण्यासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ए पी एम सी ने शेड उभे करत तात्पुरते तीन मार्केट पत्र्यांचे शेड घालून उभे केले होते. बी एस येडीयुरप्पा मार्ग वरील मालिनी सिटी मधील मार्केट वाऱ्याने पूर्णपणे कोसळले आहे.
ज्यावेळी सुसाट वारा आला त्यावेळी तात्पुरत्या उभे केलेल्या शेड मध्ये अनेक व्यापारी दलाल शेतकरी व हमलानी आसरा घेतला होता जोरात वारा आल्याने बांधलेली पत्र्याची शेडे कोसळली यावेळी बरीच तारांबळ उडाली होती.वादळी वाऱ्याने तात्पुरते मार्केट जमीनध्वस्त झाले आहे.