सुळेभावी तालुका बेळगाव येथील डोंगरात दिल्लीहून परतलेले तिघे संशयित असल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. या परिसरातील तरुणांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र डोंगरात ते लपून बसले असून अजूनही त्यांचा शोध लागला नाही. याबाबत मारिहाळ पोलिस स्थानकाला माहिती दिली असता हात वर करण्याचा प्रकार त्यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांतून वेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सुळेभावी गावातील काही तरुण डोंगरात गेले होते. यावेळी संबंधित लपून बसलेले व अनोळखीचे सामान निदर्शनास आले त्यावेळी त्यांच्याकडे पाहून ते डोंगर परिसरात गेले त्यानंतर ते गावातील तरुण परत येताना तेथून अनोळखी पसार झाले होते. या घटनेने भीती निर्माण झाली आहे. मागील काही दिवसापासून त्यांचे वास्तव्य डोंगरात असल्याची माहिती आहे. त्यामुळे मोठी भीती व्यक्त करण्यात येत आहे. याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
ज्या ठिकाणी अनोळखी होते त्या ठिकाणी एक बॅग सापडली आहे. या बागेत कपडे व इतर साहित्य होते. नागरिकांनी या बॅगेतील कपडे व इतर साहित्य जाळले असून संबंधित याचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही. अजूनही ते अनोळखी याच डोंगरभागात असल्याचा संशय आहे. काही नागरिकानी वारंवार तपासणी केली असता या नागरिकांना अनोळखी दिसल्याचे घटनाही घडल्याआहेत. त्यामुळे पोलीसानी हात वर करण्यापेक्षा त्यांची तपासणी करून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.
सुळेभावी डोंगर हा उंच आणि घनदाट असा आहे आणि त्याची रुंदी ही बरीच पसरले आहे. त्यामुळे या ठिकाणी लपून बसणे सहजशक्य आहे. त्याचबरोबर गावातील प्रार्थना स्थळात ही काही व्यक्ती असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. मात्र पोलिसांना याची माहिती देऊन देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. महत्त्वाचे म्हणजे जर संबंधित अनोळखी कोरोना पॉझिटिव्ह असतील तर काय करावे अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याचे सोयरसुतक पोलिसांना आणि आरोग्य विभागाला दिसून येत नाही. सध्या तरी डोंगर भागात लपून बसलेले यांचा शोध घेणे महत्वाचे असून याबाबत पोलिसांनी त्यांना पकडून आरोग्य विभागाकडे सोपवावे अशी मागणी होत आहे.
न्यूज कर्टसी-उदय वाणी