बेळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लॉक डाऊनची सक्तीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय शुक्रवारी दि 16 पासून घेतला आहे.शुक्रवारी रात्रीपासून सर्वत्र लॉक डाऊन अंमलबजावणीची सक्ती पोलिस करत आहेत.त्याचा परिणाम दुध वितरणावर झाला आहे.
काल शनिवारी संपूर्ण शहर आणि उपनगर परिसरात लॉक डाऊनची अंमलबजावणी कटाक्षाने झालेली पाहायला मिळाली होती.मात्र, पोलिस प्रशासनाने अचानकपणे सुरू केलेल्या लॉक डाऊन सक्तीने जीवनावश्यक वस्तूंच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचे जाणवत आहे.
आज शनिवारी सकाळी अनेकांना घरपोच दूधही मिळाले नाही त्यामुळे उपनगरातील अनेक लोक दुधासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र विविध ठिकाणी पाहायला मिळाले. शहरासह उपनगर टिळकवाडी परिसरात अशीच परिस्थिती पाहायला मिळाली.याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने दूध व अन्य जीवनावश्यक वस्तू बाबत योग्य त्या प्रकारची कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दूध वितरण ही नेमकी व्यवस्था आहे पहाटेचो ही यंत्रणा चालू होते आणि अख्या बेळगावला दूध वितरण केले जाते.वर्षानुवर्षे चाललेल्या या यंत्रणेला बेळगावच्या कोणत्या भागात किती दूध लागतं कोणत्या पद्धतीच दूध लागत याची व्यवस्थित माहिती आहे.या यंत्रणेला घरात बसवून कोणत्याही परिस्थितीत बेळगावात दुधाचा पुरवठा केला जाऊ शकत नाही दूध ही प्राथमिक गरज आहे लोकांच्या पर्यन्त दूध पोहोचले पाहिजे जे मान्यता प्राप्त ब्रँड आहेत आणि ज्यांना वितरणाचे पास आहेत त्यांना पोलीस यंत्रणेने वितरणासाठी मुभा दिली पाहिजे जर लोकांच्या पर्यन्त व्यवस्थित दूध पोहोचले नाहो तर लोक रस्त्यावर उतरतात आणि लॉक डाउनचा फज्जा उडतो अश्या वेळी ही यंत्रणा कार्यरत राहणे काळाची गरज आहे.