सर्वांना सोयीस्कर आणि कमी दरात साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी डी मार्ट हे परिचित आहे. मात्र लॉक डाऊन काळात या ठिकाणी सुरक्षित अंतर याचा अभाव दिसून आला. वारंवार सांगून देखील नागरिक ऐकत नसल्याने श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी परिश्रम घेतले.
डी मार्ट हे अनेक गरीबांना आणि मध्यमवर्गीयांना सर्व तऱ्हेच्या साहित्य खरेदीसाठी सोयीचे ठरते. मात्र येथील प्रशासनाने सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन परिस्थितीला न हाताळता मनमानी कारभार करण्याचे दिसून आले. नागरिकांना वारंवार सांगून देखील ते ऐकत नसल्याने येथील डी मार्ट चालकांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्या राहुल बड्सकर आदी कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अनेकांना सुरक्षित अंतर राखण्याचे भान आणून दिले आहे.
श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याआधीही विविध सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेऊन सहकार्य केले आहे. लॉक डाऊन काळात श्रीराम सेना हिंदुस्तान संघटना प्रामाणिकपणे सेवा बजावत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. नित्यनेमाने ते दररोज औषध फवारणी व इतर काम करत आहेत.
लॉक डाऊन काळात डी मार्ट काही काळ बंद करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा सुरू करण्यात आल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र सुरक्षित अंतर ठेवण्याचा अभाव या ठिकाणी दिसून आला. त्यामुळेच श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. डी मार्ट समोर मोठी गर्दी झाली होती. या गर्दीला फाटा देऊन अनेकांना सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करून दिल्याने अनेक आतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.