शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या कंट्रोल अँड कमांड सेंटरचा आज बुधवारपासून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापर केला जाणार आहे. या अनुषंगाने सदर “वाॅर रूम”चे काम आजपासून सुरू होणार आहे.
बेळगाव शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कंट्रोल अँड कमांड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. सध्या कोरोनामुळे देशव्यापी लॉक डाऊन जारी आहे. परिणामी स्मार्ट सिटी अंतर्गत सर्व कामे बंद पडल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने या कंट्रोल अँड कमांड सेंटर रूमचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने बुधवारपासून कंट्रोल अँड कमांड सेंटरचे काम प्रत्यक्ष सुरू होणार आहे.
या कंट्रोल अँड कमांड सेंटर अर्थात वाॅर रूमचे 14 ड्रोन आपल्या कॅमेराद्वारे शहरावर नजर ठेवणार आहेत. यासाठी 40 तंत्रज्ञ कामाला असणार असून त्याना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. एकंदर स्मार्ट सिटी योजनेच्या कंट्रोल अँड कमांड सेंटरची इमारत यापुढे शहरातील कोरोना हॉटस्पॉट आणि इतर ठिकाणी नजर ठेवण्यासाठी वापरली जाणार आहे.