अविरतपणे देशावर ओढवलेल्या संकटात अनेक संस्था आपल्या परीने काम करत आहेत. जीवनावश्यक वस्तू देण्याबरोबरच इतर सर्व काही प्रयत्न सुरू आहेत. मात्र ज्यांचे त्यांचे कार्य सीमित वेळेपर्यंत असते तर काहींनी फोटो सेशनसाठीही सामाजिक कार्याचा आव आला रे असे लोक कमी नाहीत. अशा परिस्थितीत श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्या अविरत कार्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
ज्यावेळी देशात लॉक डाऊन सुरू झाला त्या वेळेपासून श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेऊन ते अविरतपणे सुरू ठेवले आहे जोपर्यंत लोक अडवून संपत नाही. जोपर्यंत लॉक डाऊन सूरु राहील तोवर हे कार्य असेच सुरू राहणार असल्याचेही कोंडुस्कर व त्याचे कार्यकर्ते कार्यरत राहणार आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य सुरू केले आहे.
जेथे अडचण तेथे श्रीराम सेना हिंदुस्तान अशी व्याख्या बेळगाव शहर आणि परिसरात दिसून येत आहे. बेळगाव शहरातील दक्षिण, उत्तर आणि यमकनमर्डी मतदारसंघात त्यांनी सामाजिक कार्याचा बोजा उचलला आहे. प्रारंभी सिव्हील हॉस्पिटल येथील पेशंटच्या नातेवाईक व रुग्णवाहिका चालकांना आणि प्रसूतीसाठी येणाऱ्या नातेवाईक यांना चहा नाश्ता व दुपारचे जेवण आणि इतर साहित्याचे वितरण केले आहे.
![Ramakant](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/04/FB_IMG_1587052500999.jpg)
संपूर्ण शहर लॉक डाउन असल्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा हे गरिबांना वाटण्यात ते मागे पडले नाहीत. यानंतर शहर परिसरात तीन वाहने नेमून त्याद्वारे भाजी वाटप आणि इतर साहित्याचे वाटप सुरू केले आहे. याच बरोबर त्यांनी सॅनिटायझरचे वितरणही त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. बेळगाव तालुक्यातील दक्षिण भागातील पूर्व पश्चिम भागातील जवळपास 30 गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबवत औषध फवारणी केली आहे या कामी तीन गाड्या सतत काम करत आहेत.
समाजकार्यात रात्री किंवा दिवसाचा विचार न करता त्यांनी केलेल्या प्रयत्नांना आता चांगले यश आले आहे. कोणत्याही परराज्यात अडचणीत असलेल्या नागरिकांना त्यांनी मदत केली आहे. गोवा येथे एका दीड वर्षाच्या बालकाला त्यांनी बेळगाव येथे घरी आणून समाजकार्याचा खरा वसा जपला आहे. यासह अनेक कार्यात श्रीराम सेना हिंदुस्तान या संघटनेच्या माध्यमातून रमाकांत कोंडुसकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जी अविरत सेवा सुरू ठेवली आहे ती लॉक डाऊन संपेपर्यंत चालूच रहाणार आहे. त्यांच्या सेवेला अनेक जण सलाम करत आहेत.कोणतीही शासकीय मदत न घेता कुणा कडूनही देणगी न घेता राम सेनेचे कार्यकर्ते स्वताच्या खिशातून जमेल तितकी मदत करत आहेत अशी माहिती या संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी दिली आहे.
लॉक डाऊन काळात कोणतीही मदत लागल्यास 96638831333 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा असे आवाहन केले आहे.