कोरोनामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.13 मार्चपासून शाळा बंद झाल्या आहेत.नंतर देशभर लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे.त्यामुळे शिक्षण खात्याने काही महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे.
प्राथमिक आणि उच्च शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी फेसबुक लाईव्ह वरून ही माहिती दिली आहे.शिक्षण खात्याच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठकही त्यांनी घेतली आहे.
पहिली ते सहावी पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्यात येणार आहे.तसेच सातवी,आठवी आणि नववीची परीक्षाही न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यांचा अगोदरच्या परीक्षेतील गुणवत्ता ध्यानात घेऊन त्यांना पास करण्यात येणार आहे.
दहावीची परीक्षा आणि बारावीची परीक्षा मात्र घेतली जाणार आहे.दहावी आणि बारावीची तारीख 14 एप्रिल नंतर घोषित करण्यात येणार आहे .विद्यार्थ्यांनी घरातच बसावे,बाहेर पडू नये असे आवाहनही शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी केले आहे.