रेड झोन्स” मध्ये 14 एप्रिलनंतर देखील लॉक डाऊन – मुख्यमंत्री

0
12353
Yedurappa
 belgaum

बेंगलोरसह राज्यातील कोरोना बाधित अन्य “रेड झोन्स” मध्ये येत्या 14 एप्रिलनंतर देखील लॉक डाऊन जारीच राहणार असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी जाहीर केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्यांमध्ये “रेड झोन्स” करण्यात आले आहेत. या रेड झोन्सवर राज्य शासन आणि आरोग्य खात्याचे विशेष लक्ष असणार आहे. राज्यात ज्या ठिकाणी 9 किंवा 10 पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत अशा प्रदेशांना रेड झोन म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी 100 टक्के लॉक डाऊन असणार आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून येत्या 14 एप्रिलनंतर राज्यातील लाॅक डाऊन पर्यायाने संचार बंदी उठवण्यात येणार असली तरी रेड झोन्समधील संचारबंदी 14 एप्रिलनंतर टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाणार आहे. राज्यातील बेंगलोरसह रेड झोनची अन्य ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

बेंगलोर येथे आत्तापर्यंत 45 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल राज्यात म्हैसूर (35), बिदर (10) बेळगाव (10), मंगळूर व कारवार (प्रत्येकी 8) येथे सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जाहीर केल्याप्रमाणे रेड झोनची अंमलबजावणी झाल्यास बेळगाव जिल्हा रेड झोनच्या यादीत असणार आहे. बेळगावसह बेंगलोर शहर, बेंगलोर ग्रामीण, म्हैसूर, मंगळूर, चिकबळ्ळापूर, कलबुर्गी, बेळ्ळारी, बिदर, मंड्या, बागलकोट, दावणगिरी, कोडगु, तुमकुर, धारवाड आदी 18 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

 belgaum

सरकारने “रेड झोन”चा आदेश जारी केल्यास कोरोना प्रादुर्भाव असलेला संबंधित भागातील कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. रेड झोन प्रदेशात 100 टक्के बंद म्हणजे संचारबंदी असणार असून दूध, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्यास नागरिकांना सरकारी सहाय्यवाणीशी संपर्क साधून संबंधित वस्तू ऑनलाईन मागवाव्या लागणार आहेत. रेड झोन असलेल्या भागात ऍम्ब्युलन्स आणि पोलिस वाहन खेरीज कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.