यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जनतेसाठी विविध प्रकारे मदत करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.मास्टर माईंड राजकारणी म्हणून ते ओळखले जातात ते यासाठीच.मतदार संघात मोफत मास्कचे वितरण करण्याच्या निमित्ताने त्यांनी आपला मतदार संघ पिंजून काढून जनतेच्या समस्यांची नोंद घेतली आणि त्या समस्या सोडवण्यासाठी कार्यारंभ देखील केला आहे.
सध्या शेतात पिकलेल्या भाजीपाल्याला भाव मिळत नाही आणि परगावालाही पाठवता येत नाही.त्यामुळे निराश झालेला शेतकरी उभ्या पिकाच्या शेतात ट्रॅक्टर फिरवत आहे.ही गोष्ट समजल्यावर सतीश जारकीहोळी यांनी शेतकाऱ्या कडून योग्य भावाने भाजीपाला खरेदी करण्यास प्रारंभ केला आहे.
हा भाजीपाला त्यांनी आपले कार्यकर्ते मलगौडा पाटील आणि सिद्धू सुणगार यांच्यामार्फत मतदार संघातील गरिबांना मोफत वाटण्यास प्रारंभ केला आहे.त्यांचे आणखी एक कार्यकर्ते हबीब शिल्लेदार यांनी आपला कपड्याचा उदयोग थांबवून तेथे मास्क तयार करण्यास प्रारंभ केला आहे.हे मास्क मतदार संघात वितरित केले जाणार आहेत.
बेळगावात अनेक राजकीय नेते आपापले मतदार संघ पिंजून काढत असताना सतीश जारकिहोळी यांनी मास्क वितरण व भाजीपाला वितरणात आघाडी घेतली आहे. या अगोदर ते मतदारसंघात फिरत नाहीत असा त्यांचेवर आरोप होत होता मात्र कोरोना व मागील पुराच्या काळात त्यांनी मतदारसंघात तळ ठोकून तो आरोप देखील पुसून टाकला आहे.