श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने टिळकवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस दलाच्या सुरक्षेसाठी निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. यामुळे पोलीस दलाने श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.
संपूर्ण देशात लॉक डाऊन असल्यामुळे पोलिसांचेही नाहक त्रास होत आहेत. पोलिस 24 तास कर्तव्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे कोण लक्ष देणार असा सवालही उपस्थित होत असतानाच श्रीराम सेना हिंदुस्तान या संघटनेच्यावतीने टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच निर्जंतुकीकरण कक्ष करण्यात आले आहे. या कक्षा मुळे कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येईल. या दृष्टीकोनातून उपाय योजना आखण्यात आली आहे.
पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता आहो रात्र झटत आहे.त्यामुळे त्यांच्या व त्यांच्या कुटूंबाच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. याची दखल घेत श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेच जे ब्रिद वाक्य आहे सेवा,सुरक्षा, संस्कार हे खर ठरवत कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने या पोलीस दलाच्या रक्षणासाठी निर्जंतुकीकरण कक्ष उभारले आहे.
या कक्षात सेन्सर बसविण्यात आल्याने ऑटोमॅटिक ते चालू आणि बंद होते. संघटनेचा कार्यकर्ता समीर पाटील याने विशेष मेहनत घेतली आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक बडीगेर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.