रविवार पेठेतील व्यापाऱ्यांची बुधवारी रात्री हिडदुग्गी यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची बैठक पार पडली.या बैठकीत सायंकाळी सहा ते रात्री अकरा या वेळेत होलसेल व्यापार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या वेळेत ग्राहकांना सामान दिले जाणार आहे.किरकोळ विक्री केली जाणार नाही असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांना दिवस ठरवून देण्यात आले आहेत.त्याप्रमाणे त्या व्यापाऱ्यांना विक्री केली जाणार आहे.रात्री अकरा नंतर माल उतरविण्यात येणार आहे.यासाठी धान्य,तेलाचे व्यापारी आणि डाळीचे व्यापारी यांनी आपली सगळी माहिती गुरुवारी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्लाटिक साहित्याची विक्री करणारी दुकाने बंद राहतील असेही कळविण्यात आले आहे.किरकोळ व्यापारासाठी होम डिलिव्हरी सुरू करण्यात येणार आहे तर केवळ व्होलसेल साठी रविवार पेठ खुली असणार आहे.
रविवारी हुक्केरी घटप्रभा आणि गोकाक तर सोमवार खानापूर मंगळवारी स्थानिक बेळगाव तालुका बुधवारी संकेश्वर निपाणी चिकोडी व्होलसेल खरेदीसाठी येणाऱ्यांना दिवस ठरवले आहेत.