कोरोना पासून बचाव करण्यासाठी केवळ माणसेच मास्क घालत नाहीत तर घुबड,ससा,उंदीर,मुलगी,बेडूक देखील मास्क घालत आहेत.
होय,घुबड,ससा,उंदीर,लहान मुलगी आणि बेडूक यांनी मास्क घातलेले दृश्य बेळगावात पाहायला मिळाले.स्वतःच्या सुरक्षेसाठी मास्क वापरा असा संदेश देण्यासाठी बेळगावच्या आशा पत्रावळी यांनी घुबड,ससा, उंदीर,बेडूक यांना मास्क घातले आहेत.लोकरीचा वापर करून आशाताईंनी अनेक वस्तू तयार केल्या आहेत.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून आपण काही त्यासाठी संदेश दिला पाहिजे म्हणून आशाताईंनी लोकरीपासून तयार केलेल्या घुबड,ससा,उंदीर,बेडूक यांना मास्क चढवले आहेत.हे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पाठवले असून त्याला लोकही दाद देत आहेत.