बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बेळगाव जिल्ह्यात दारूविक्री करण्यास परवानगी देणार नाही अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.
शनिवारी दुपारी शासकीय विश्राम धामात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.सध्या दारू बंदी असल्याने कोणतीही समस्या अद्याप उदभवली नाही त्यामुळे पूर्णपणे कोरोना नियंत्रणात येई पर्यंत जिल्ह्यात दारू विक्री नको अश्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
कोणताही दबाव न झुगारता क्वांरंटाइन रुग्णांना घरा ऐवजी हॉटेल किंवा शासकीय हॉस्टेल मध्येच ठेवा अश्या सूचना प्रशासनाला केल्या.लॉक डाऊन मुळे जनतेची आर्थिक स्थिती दोलायमान झाली आहे सहकारी बँका पथ संस्था पुन्हा सुरू करून ग्राहकांना सेवा देण्या बाबत बैठक घ्या अश्या देखील सूचना त्यांनी केल्या.
वैधकीय सेवा बजवणाऱ्या कर्मचाऱ्यांना पी पी ई किट कोणत्याही परिस्थितीत देण्यात यावे जिल्ह्यात असलेल्या व्हॅटीलेटर ची संख्या देखील वाढवा अशी विनंती त्यांनी शेट्टर यांना केली.