मंगळवारी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसामध्ये अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर बेकिनकेरे येथे दोन शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून सुमारे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
लक्ष्मण बिर्जे यांच्या घरावरील पत्रे उडून सुमारे 20 ते 25 हजार रुपयांचे नुकसान झाले असून सध्या त्यांना इतरत्र रहावे लागत आहे. वाऱ्या मुळे मोठ्या प्रमाणात पत्रे इतरत्र जाऊन पडले होते. ते पत्रे फुटले असून नवीन पत्रे आणण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात पत्रे खराब झाले असून आम्हाला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी यांनी केले आहे.
याच गावातील विठ्ठल नंदगडे यांच्या घरावरील देखील पत्रे उडाले आहेत. त्यांचे सुमारे 15 ते 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जोरदार पावसाबरोबरच वाऱ्याने हजेरी लावल्याने ही नुकसान भरपाई झाली आहे. सध्या त्यांच्या डोक्यावरील छत्र गेल्याने भाडोत्री घरांमध्ये त्यांनी तात्पुरता आसरा घेतला आहे. झालेले नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
मंगळवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट ही मोठ्या प्रमाणात झाला. अनेक ठिकाणी सुसाट सुटणाऱ्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेतीलाही या पावसाचा फटका बसला आहे. मशागतीसाठी हा पाऊस लाभदायक असला तरी अजूनही शेतामध्ये अनेक पिके असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.