भारतीय रेल्वेने येत्या 15 एप्रिलपासून धावणाऱ्या सर्व रेल्वेचे ऑनलाईन बुकिंग मागील चार दिवसांपासून सुरू केले आहे. यामुळे देशातील लॉक डाऊन येत्या बुधवार दि. 15 एप्रिल 2020 पासून समाप्त होण्याची शक्यता आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशभरातील सर्व रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 24 मार्च रोजी 21 दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केल्यानंतर भारतीय रेल्वेकडून सर्व मार्गावरील रेल्वे सेवा बंद केल्या होत्या. आता 14 रोजी लाॅक डाऊनचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 15 एप्रिलपासून रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, ऑनलाइन बुकिंग सुरू झाले असले तरी रेल्वे स्थानकावरील तिकीट काऊंटर 14 एप्रिलपर्यंत बंदच असणार असून रेल्वे सुरू झाल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. मागील चार दिवसांपासून रेल्वेचे ऑनलाईन बुकिंग सुरू झाले आहे. प्रवासाच्या तिकिटांचे बुकिंग करण्याची व्यवस्था आयआरसीटीसी या वेबसाईटवर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशभरातील रेल्वे सेवा 14 एप्रिल पर्यंत बंद आहे. मागील चार दिवसांपासून ऑनलाइन तिकीट बुकिंगची सुविधा खुली केली आहे. प्रवाशांना ऑनलाईनद्वारे 15 एप्रिल नंतर धावणाऱ्या रेल्वे सेवांचे बुकिंग करता येणार असल्याचे नैऋत्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्राणेश यांनी सांगितले आहे.