बेळगाव तालुक्यात पिरनवाडी हा तिसरा असा परिसर आहे की तो कंटेमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे या अगोदर बेळगुंदी,हिरेबागेवाडी कॅम्प हे परिसर कॅटेन्मेट झोन म्हणून जाहीर करण्यात आले होते.पिरनवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने पिरनवाडी गाव “कंटेनमेंट झोन” म्हणून घोषित केले आहे.
“कंटेनमेंट झोन” म्हणून घोषित केल्यामुळे पिरनवाडी गावाचा 3 कि. मी. अंतराचा परीघ सील करण्यात आला आहे. या भागात आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनांखेरीज कोणालाही आत किंवा बाहेर जाऊ दिले जाणार नाही. या भागात कोणत्याही वाहनाच्या रहदारीवर तसेच रस्त्यावर चालत जाण्यासही बंदी आहे. कन्टेन्मेट झोनखेरीज या ठिकाणी आणखी दोन कि. मी.चा परिसर “बफर झोन” म्हणून घोषित करण्यात आला आहे. कंटेनमेंट झोन सील करण्यात आला असून पिरनवाडीतील सर्व प्रवेश मार्ग बंद करण्यात आले आहेत.
कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश करणारे कोणतेही वाहन सॅनिटाईझ अर्थात निर्जंतुक केले गेले पाहिजे. गावातील सर्व रहिवाशांनी आरोग्य खात्याच्यातर्फे कंटेनमेंट झोनसाठी आवश्यकतेनुसार जाहीर करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. त्याचप्रमाणे त्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. या क्षेत्रात पाच पेक्षा अधिक लोक एकत्र जमू शकणार नाहीत.
कंटेनमेंट क्षेत्रातील किराणा, औषध आदी सर्व दुकाने आणि कार्यालये बंद राहतील. या क्षेत्रातील नागरिकांना सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत सामाजिक अंतर ठेवून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास मुभा देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनमधील सर्व रहिवाशी होम काॅरन्टाईन असतील.