संपूर्ण देशभरात लॉक डाऊन ची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पत्रकार आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा बजावत आहेत. मात्र काही पत्रकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याची दखल घेऊन पत्रकार विकास अकादमीच्या वतीने गरजू पत्रकारांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
दैनंदिन सेवा बजावणाऱ्या पत्रकारांची परिस्थिती बर्यापैकी असली तरी साप्ताहिक आणि मासिक स्वरूपात अंक काढणाऱ्या आणि सेवा बजावणाऱ्या पत्रकारांची परिस्थिती हलाखीची आहे. अशा पत्रकारांना विकास अकादमीतर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे.
सध्या अडचणीत असलेल्या पत्रकारांसाठी काही किट्स तयार करण्यात आले असून नेहरूनगर येथील पत्रकार विकास अकादमीच्या कार्यालयात हे साहित्य ठेवण्यात आले आहेत. ज्या गरजू पत्रकारांना साहित्य हवे असल्यास त्यांनी संपर्क साधावे असे आवाहन पत्रकार विकास अकादमीचे अध्यक्ष प्रसाद सु. प्रभू यांनी केले आहे.
देशातील परिस्थिती आणखीन गंभीर होत असताना आता अनेकांनी मदतीचा हात पुरविण्यास सुरुवात केली आहे. पत्रकारांनाही बाहेर फिरावे लागते या दृष्टिकोनातून यल्लोजीराव पाटील, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे, राकेश कलघटगी आणी स्नेह संपतू या संस्थेच्या माध्यमातून काही मास्कही देण्यात आले आहेत. ज्या पत्रकारांना गरज आहे त्यांनी मोबाईल क्रमांक 9342209296 याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.