बेळगाव जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण पॉजीटिव्ह असल्याचा रिपोर्ट आल्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.हिरेबागेवाडी येथील हा रहिवासी असून त्याला त्याच्या मुलाकडून संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे.
मुलगा दिल्लीला निजामुद्दीन मरकज धर्मसभेला गेला होता.दिल्लीहून आल्यावर मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.आता मुलाकडून बापाला लागण झाल्याचें उघडकीस आले आहे.बाप कांद्याचा व्यवसाय करतो.त्यामुळे आता बापाला लागण झाल्याचे उघड झाल्यावर त्याच्याकडे खरेदी करताना संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे.
शिवाय हा कांद्याचा व्यापारी मशिदीत देखील नियमित जात होता.त्यामुळे त्याच्याकडून किती जणांना लागण झाले याचा शोध प्रशासन,आरोग्य खाते घेत आहे.
अगोदरच हिरेबागेवाडी गाव व आसपासचा परिसर हा कंटेमेंट झोन म्हणून घोषित झाला आहे त्यात याच भागात संसर्ग होऊन हा दुसरा रुग्ण पोजिटिव्ह झाला आहे त्यामुळे आरोग्य खात्याचे हिरे बागेवाडी गावावर अधिक लक्ष केंद्रित झाले आहे.1410 जण निरीक्षण खाली आहेत तर 33 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे त्यात आणखी किती पोजिटिव्ह येतात का याकडे देखील बेळगाव जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागून राहील आहे.