हिरेबागेवाडी येथील ऐशी वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू झाला असून ही वृद्धा कोरोना रुग्णाच्या प्राथमिक संपर्कात आली होती.कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 21 व्यक्तींना इन्स्टिट्युशनल कोरोटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे.
आज सकाळी साडेदहा वाजता मृत्यू झालेली वृद्धा कोरोना रुग्णाच्या प्राथमिक संपर्कात आली होती.त्यामुळे तिच्या घशाचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आला आहे.
प्रयोगशाळेतून अहवाल आल्यावर मृत्यूचे नक्की कारण समजणार आहे.वैद्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार त्या वृद्धेचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असावा असा प्राथमिक अंदाज वैद्यांनी व्यक्त केला आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.मृत व्यक्तीवर सरकारी नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.