देशभरात थैमान घातलेल्या आणि अनेकांना धास्ती लागून असलेल्या कोरोणा विषाणू बाबत आता अनेकजण गांभीर्याने घेत असले तरी अजूनही काहिना याचे गांभीर्य समजत नसल्याचे उघडकीस आले आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हिरे बागेवाडी येथे आणखी एका रुग्ण आढळला असून त्याची खबरदारी म्हणून पोलीस स्थानकात महत्त्वाची बैठक घेण्यात आली.
बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याच प्रमाणे आता कोरोनाची लागण झालेल्यांची संख्याही वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बऱ्याच ठिकाणी लॉक डाऊनचा विळखा वाढविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा रविवारी आणखी चार रुग्ण आढळल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे हिरेबागेवाडी येथे सुरक्षित अंतर आणि इतर कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या वर कारवाईचा बडगा उचलण्याची तयारीचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
हिरेबागेवाडी हे बेळगाव तालुक्यातील महत्वाचा कंटेमेंट झोन आहे कारण या एका गावात तब्बल 5 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.दिल्ली मरकज रिटर्न एका युवकाला बाधा झाल्या नंतर त्याचे आई वडील भावाला लागण झाली होती त्या नंतर रविवारी आणखी एकास संपर्क होऊन लागण झाली आहे.त्यामुळे हिरेबागेवाडी सध्या हाय अलर्ट मोड वर आहे. या गावात करणाऱ्या उपाय योजना संदर्भात अधिकाऱ्यांनी चर्चा केली.
हिरे बागेवाडी पोलीस स्थानकात अनेक अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. रविवारी सापडलेल्या चार रूग्णांमध्ये हिरे बागेवाडी येथील एक रूग्ण असल्याने ही खबरदारीची उपाययोजना आखण्यात आली आहे. या यादीत पूर्णा एक हिरे बागेवाडी त्याच रुग्ण आढळल्याने गावाला नाकाबंदी करण्याचे ठरविण्यात आले. यामुळे आता हिरेबागेवाडी गावात संपूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाहेरील व्यक्ती आत येऊ नये आणि आतील व्यक्ती बाहेर जाऊ नये अशी खबरदारी घेण्यात आली आहे.
बैठकीला बुड आयुक्त, तहसीलदार, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लीकर्जून कलादगी आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यासह इतर खात्यातील अधिकारी उपस्थित होते. सर्वानुमते पोलिस बंदोबस्त ठेवावा आणि याचा गैरफायदा होऊ नये यासाठी नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे.