दिल्ली येथील तबलीग जमातीच्या मर्कस धर्मसभेत सहभागी झालेल्या बेळगावच्या त्या 63 जणात सध्या कोरोनाची लक्षण नाहीत असे स्पष्टीकरण बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी दिले आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन मरकजला बेळगाव जिल्ह्यातून 63 व्यक्ती गेल्या असल्याची माहिती मिळाली आहे.त्यांच्याविषयी सगळी माहिती गोळा करण्यात येत आहे.त्यापैकी 42 जणांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे.यापैकी 22 व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी बंगलोरला पाठविण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.एस बी बोमनहळ्ळी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
दिल्लीला मरकज धर्मसभेला गेलेल्या व्यक्ती आणखी कोणी आहेत काय याची माहिती घेण्यात येत आहे.जर कोणी मारकज धर्मसभेला गेलेले असतील त्यांनी स्वतःहून जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे.समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने गेलेल्या व्यक्तींनी आपली तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
जर कोणाला त्याची माहिती असेल तर त्यांनी ती कळवावी.जर आपणहून गेलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घेतली नाही तर नंतर उघड झाल्यावर त्यांच्यावर आणि त्यांना आसरा देणाऱ्यार कारवाई करण्यात येईल असेही पत्रकात जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
लोकांनी अफ़वा वर देखील विश्वास ठेवू नये असेही त्यांनी आवाहन केलंय