कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार बेळगाव जिल्ह्यात सोमवार दि. 27 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 2,685 जणांचे स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेत धाडण्यात आले आहेत. त्यापैकी पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या नमुन्यांची संख्या आज सलग दुसऱ्या दिवशी 54 (1) इतकी स्थिर आहे. तसेच 984 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने जाहीर केलेल्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 27 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 3,630 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 1,450 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 47 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 999 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 1,134 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 2,685 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी अद्यापपर्यंत 54 (1) नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे 1,626 नमुने निगेटिव्ह असून ॲक्टिव्ह केसीस 47 आहेत. त्याचप्रमाणे 984 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 6 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 47 केसीस ऍक्टिव्ह आहेत.
सोमवारी देखील बेळगावात एकही पोजिटिव्ह रुग्ण आढळला नाही मात्र राज्यात 11 रुग्णांची भर पडली आहे बेळगावात 54 तर राज्यात 512 पोजिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, भारताबाहेरील कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींनी अथवा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसली तरीही भारतात आलेल्या दिवसापासून 14 दिवस घरगुती विलगीकरणात रहावे, घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे संबंधितांनी स्वतःहून नजीकच्या सरकारी हॉस्पिटल अथवा 104 हेल्थ – हेल्पलाईन कॉल सेंटरशी किंवा आरोग्य सहाय्यवाणी डीएसयू बेळगाव 0831- 2424284 येथे संपर्क साधून आपली माहिती द्यावी. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. खोकला अथवा शिंक आल्यास टिश्शू पेपर किंवा रुमाल तोंडावर धरावा. प्रत्येकाने आपले हात साबण लावून पाण्याने अथवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग शक्यतो टाळावा, आदी खबरदारीच्या सूचनाही जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याणन कार्यालयाच्या सर्व्हिलन्स युनिटने आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जनतेला दिल्या आहेत.