सध्या कंटेन्मेंट झोनच्या यादीत असलेल्या हिरेबागेवाडी गावातील शिवबसव नगर येथील रहिवाशी शिवरूद्रैया बसवंत आष्टगी हा इसम कामानिमित्त गेल्या काही दिवसांपासून मुचंडी येथे ये जा करत होता.
सध्या कोरोनामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे.त्यामुळे त्या व्यक्तीची माहिती काढली असता तो हिरेबागेवाडीचा असल्याचे कळले.म्हणून ग्राम पंचायत पि डी ओ जयमाला यांना ग्रामस्थांनी त्या व्यक्तीबद्दल सांगितले.
नंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्या व्यक्तिला चांगला चोप दिला.देण्यात आला. हिरेबागेवाडी सिद्धेश्वर नगर येथील त्या व्यक्तीचा गावातील काही महिला त्या व्यक्तिचा जोंधळा निवडण्यासाठी कामाला होत्या.
या मुळे मुचंडी गावात एकच खळबळ उडाली आहे. मारीहाळ पोलीस स्थानकांत बातमी कळवून दोन तास झाले तरी एकही पोलीस या ठिकाणी आला नाही म्हणूण मुचंडी येथील रहीवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे या घटनेनंतर ग्रां पं च्या वतीने सिद्धेश्वर नगर परिसरात सॅनिटायजर ची फवारणी करण्यात आली.