वायव्य परिवहन खात्यातर्फे निर्मिती करण्यात आलेल्या मोबाईल बस क्लिनिकचे हस्तांतरण उपमुख्यमंत्री आणि परिवहन खात्याचे मंत्री लक्ष्मण सवदी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केले.यावेळी पालकमंत्री जगदीश शेट्टर ,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश
अंगडी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
तीन मोबाईल बस क्लिनिकची निर्मिती करण्यात आली आहे.हुबळी येथील वायव्य परिवहन खात्याच्या कार्यशाळेत या मोबाईल बस क्लिनिकची निर्मोती करण्यात आली आहे.मोबाईल बस क्लिनिक ही सेवा चोवीस तास उपलब्ध असणार आहे.हेल्पलाईन ,टोल फ्री नंबरला फोन केल्यावर ही बस लगेच उपलब्ध होणार आहे.बसमध्ये एक डॉक्टर,नर्स असणार आहेत.रुग्ण तपासणी बेड,आसन व्यवस्था,पंखा आदी सुविधा मोबाईल बस क्लिनिकमध्ये आहेत.सॅनिटायझर ,पीपीई किट,औषधे आदी मोबाईल बस क्लिनिक मध्ये आहेत.यापैकी एक बस हिरेबागेवाडी, एक रायबाग कुडची आणि एक बेळगाव शहरात उपलब्ध असणार आहे.
कोरोना वॉर रुमचे उदघाटन बेळगावचे पालकमंत्री जगदीश शेट्टर यांच्या हस्ते करण्यात आले.स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेन्टरमध्ये कोरोना वॉर रूम सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर बहुमोल ठरणार आहे.
.वॉर रुममुळे आरोग्य आणि पोलीस खात्याला कंटेन्मेंट झोन,लॉक डाऊन उल्लंघन,जनतेच्या हालचाली यावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.कंटेन्मेंट झोनमधील सीसीटीव्ही आणि चौदा ड्रोन कॅमेरे याद्वारे सगळ्यावर नजर ठेवली जाणार आहे.याशिवाय येथील कर्मचारी फोनवरून संपर्क साधून आजारी व्यक्तीची माहिती घेणार आहेत.कोरोनाशी संबंधित सगळी माहिती या वॉर रूममधून मिळणार आहे.
वॉर रूम उदघाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी ,लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.