कंटेन्मेंट झोनमध्ये मास्क न लावता रस्त्यावर येणाऱ्या व्यक्तीवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवून त्यांना शिक्षा करा अशी मागणी लोकप्रतिनिधींनी महानगरपालिकेत बोलावण्यात आलेल्या बैठकीत केली.
कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांचे पालन कठोरपणे केले जावे अशीही मागणी लोक प्रतिनिधींनी केली.
त्या भागातील तसेच शहरातील अन्य भागातील जनतेला घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्याच्या दृष्टीने देखील चर्चा करण्यात आली.
बैठकीला धान्य,किराणा व्यापारी ,मनपा अधिकारी,पोलिस अधिकारी उपस्थित होते.शहरात प्रत्येकाच्या घरी किराणा साहित्य ,धान्य,भाजीपाला पोचविण्या संबंधी चर्चा केली.
आपल्या भागातील ग्राहकांना घरपोच साहित्य पुरवण्यासाठी दुकानदारांनी पाऊले उचलावीत असे आवाहनही व्यापाऱ्यांना करण्यात आले.बैठकीला आमदार अनिल बेनके,मनपा आयुक्त के .एच.जगदीश,एसीपी नारायण बरमणी,एसीपी चंद्रप्पा आदी उपस्थित होते.