कोरोना नियंत्रित करण्यासाठी संपूर्ण देश लॉक डाऊन झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे ही सर्वत्र डोकेदुखी आहे. अशा परिस्थितीत पोलिसांच्या सतत प्रयत्नात आणि जिल्ह्यातील खेड्यात कोणत्याही प्रकारची गडबड न होता बेळगाव मार्केट पोलिसांनी नियोजित रित्या प्रत्येकाला साहित्य वितरण करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
तालुका केंद्रांवर किराणा मालाची विक्री करणार्या घाऊक दुकानांना कुलूप ठोकले आहे. अशा प्रकारे तालुका व ग्रामीण किराणा दुकानदार रविवार पेठ येथील होलसेल मार्केटमध्ये येत आहेत. सकाळच्या सत्रात हे काम सुरू आहे. मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सुरक्षित अंतराच्या दृष्टीने मार्केट पोलिसांनी योग्य त्या खबरदारी घेऊन येथील नागरिकांना मार्गदर्शन करत सामान खरेदी विक्री सुरू ठेवली आहे. काही वेळा सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असला तरी पोलीस मात्र रविवार पेठ मध्ये अधिक च सजग आहेत.
तालुका केंद्रांचे किराणा दुकानदार तसेच व्यापारी शहरातील रविवार पेठ येथे दाखल होत आहेत. येथे दररोज शेकडो वाहने येतात. मार्केट पोलिस ठाण्याचे कर्मचारी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिश्रम घेत आहेत. रविवारी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील दुकानदारांनी गर्दी केली होती. त्यांना योग्य मार्गदर्शन करून तसेच कोरोना बाबत जागृती करून साहित्य खरेदी विक्री करण्यास पोलिसांनी मदत केली.
मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी सामाजिक हीच जपत स्वतः माईक हातात घेऊन प्रत्येक नागरिकांना मार्गदर्शन करत होते. मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रविवार पेठ येथे पहाटे पाच पासून ते दुपारी 12 पर्यंत अनेकांना सुरक्षित अंतर ठेवून खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यांच्या कर्तव्यदक्ष पणामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील खेड्यातून किराणा सामान खरेदी करण्यासाठी सकाळी सकाळी शेकडो वाहने किराणा सामान गावात पोचविण्यासाठी येतात. यामुळे रविवार पेठ येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या वाहनांची योग्य पार्किंग आणि मालाचे ने-आण करण्यास मार्केट पोलिसांनी बरेच परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
ಮಾರ್ಕೆಟ್ ಪೋಲಿಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿಗೆ ನನ್ನದೊಂದು ಗೌರವದ ಸಲಾಂ