मराठा मंदिरतर्फे अनेक सामाजिक कार्यात पुढाकार घेण्यात येतो. सध्या कोरोनामुळे देशभरात अनेकांची उपासमार चालू आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना सहकार्य करण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेताहेत. अशा परिस्थितीत मराठा मंदिरने पुढाकार घेऊन जे आर्थिक आणि साहित्य वितरणाचे कार्य केले आहे ते अभिनंदनास पात्र आहे, असे मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी व्यक्त केले आहे.
बेळगावमध्ये अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत तसेच साहित्याचे वितरण केले आहे. यामध्ये आता मराठा मंदिर ही पाठीमागे राहिले नाही. त्यांनीही साहित्याचे वितरण आणि सहाय्याने निधी देऊन मदत केली आहे. संपूर्ण देश कोरोनाशी झुंजत असताना मराठा मंदिर कमिटीने 50 गरिबांना साहित्य वितरण आणि एक लाख रुपये पंतप्रधान सहाय्य निधीला मदत केली आहे, त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे असे मत आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले.
मराठा मंदिरतर्फे याआधी अनेक समाजिक कार्यात सहभाग घेण्यात आला आहे. ज्या ज्या वेळी देश आर्थिक संकटात असतो त्यावेळी मराठा मंदिर पुढाकार घेऊन मदतीचा हात करते. कोरोनाच्या संकटातही मराठा मंदिर हे पाठीमागे राहणार नाही असे आश्वासन अध्यक्ष शिवाजीराव हंगरगेकर यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्य वितरण करण्यात आले.मराठा मन्दिर कमिटीने पी एम ओ केअरला एक लाखांचा निधी मंत्री सुरेश अंगडी यांच्या कडे सुपूर्द केला.
या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके, मराठा मंदिरचे अध्यक्ष शिवाजीराव हंगिरगेकर, चंद्रकांत गुंडकल, आप्पासाहेब गुरव, नेताजी जाधव, बाळासाहेब काकतकर यांच्यासह आदी उपस्थित होते.