कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड फायनान्स कार्पोरेशनकडून (kuidfc) एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या पाणी आणि सांडपाणी शुद्धीकरण विभागाला बेळगावसह तीन ठिकाणी ईपीसी पाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचे कंत्राट मिळाले आहे. हे प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या पाणी व्यवस्थापन प्रकल्पांपैकी एक असणार आहेत.
राज्यातील बेळगाव शहरासह हुबळी – धारवाड आणि कलबुर्गी येथे कार्यक्षम खर्च आणि 24×7 तास पूर्ण दाबाने शाश्वत पाणी पुरवठा होईल यादृष्टीने पाणीपुरवठा योजना आराखडा तयार करणे, त्यानुसार प्रकल्प उभारणे, त्याची देखभाल करणे आणि पाणीपुरवठा योजनेचे हस्तांतरण करणे या बाबी सदर कंत्राटामध्ये समाविष्ट आहेत. या प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे ग्राहकांना 24×7 तास पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करणे तसेच योग्य पाणी पायाभूत सुविधांचा विकास करून नुकसान टाळण्यासद्वारे बिगर महसूल पाण्याचे (एनआरडब्ल्यू) उद्दिष्ट गाठणे हे या प्रकल्पाचे ध्येय आहे. हे प्रकल्प अशा पद्धतीने उभारले जाणार आहेत की ज्याद्वारे सुमारे 29 लाख लोकांना पूर्ण दाबाने 24×7 तास पाणी उपलब्ध होणार आहे.
बेळगाव शहरासह हुबळी – धारवाड आणि कलबुर्गी येथील इंजीनियरिंग प्रॉक्युअरमेंट कन्स्ट्रक्शन (ईपीसी) प्रकल्प हे देशातील सर्वात मोठ्या पाणी व्यवस्थापन प्रकल्पांपैकी एक असणार आहेत. घरगुती पाणी वापराच्या क्षमतेत सुधारणा व्हावी या सरकारच्या दृष्टिकोनातून एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या पाणी आणि सांडपाणी शुद्धीकरण विभागाकडून सध्या देशाच्या विविध भागात असे पाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे.