कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात भीतीचे वातावरण आणि धास्ती लागून राहिली आहे. अशा परिस्थितीत जर लॉक डाऊन संपविण्यात आला तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी 15 मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
राज्यात कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लाॅकडाऊन काटेकोर पणे पाळला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांनी लाॅकडाऊन बाबतीत चर्चा केली. पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेतून लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता आहे, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितले. त्यामुळे राज्यात आणखी काही दिवस घरीच रहावे लागणार यात शंका नाही असे बोलले जात आहे.
या वेळी पंतप्रधानांनी कोरोना विषाणू रोखणे लाॅकडाऊनची परिस्थिती राज्यातील परिस्थिती या बाबतीत सविस्तर माहिती घेतली. लाॅकडाऊन वाढविल्यास जिल्हास्तरीय सवलत देण्यात येणार आहे का? या बाबतीत विचारलेल्या प्रश्नाला पंतप्रधानांनी ऊत्तर दिले नाही, असेही मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी सांगितले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस लॉक डाऊन वाढणार हे निश्चित झाले आहे.
लाॅकडाऊन 3 मे नंतर 15 मे पर्यंत वाढण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविली. पंतप्रधान जो निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही बांधील असून पंतप्रधानांचे समथ॔न करणार असल्याचे येडियुरप्पा म्हणाले. मात्र काही अंशी सूट देण्याबाबतही चर्चा झाल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. काही उद्योग धंद्यांना चालना देऊन आर्थिक परिस्थिती बळकट करण्याकडे ही लक्ष देणार असल्याचे येडियुराप्पा यांनी सांगितले.