कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी लॉक डाऊनचा कालावधी वाढवला असून आता लॉक डाऊन आता पुढील आणखी काही आठवडे राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या लॉक डाऊनचा कालावधी 14 एप्रिल रोजी संपणार आहे.आज पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यावर मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी लॉक डाऊन आणखी काही वाढवणार असल्याचे जाहीर केले.
लॉक डाऊनची अंमलबजावणी कर्नाटक राज्यात कठोरपणे केली जाणार आता काटेकोरपणे केली जात होती यापुढे कठोरपणे केली जाईल लॉक डाऊनच्या कालावधीतील मार्गदर्शक सूचना दोन दिवसात पंतप्रधान आणि आरोग्य मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात येतील पुढचे काही आठवडे हे भारत देशाच्या दृष्टिकोनातून कसोटीचे आहेत असे ते म्हणाले.
लॉक डाउनच्या बाबतींत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटक सरकारने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या उपाय योजनांचे कौतुक केले आहे.डॉक्टर आणि वैधकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणारे दमदाटी करणारे यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.संपुर्ण राज्यात लॉक डाऊन उल्लंघन केलेली 40 हजार हुन अधिक वाहने जप्त तर 2 हजारहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत असेही त्यांनी नमूद केले.