Thursday, December 19, 2024

/

मटण खाण्याचा बेत आला अंगलट

 belgaum

 

 

 

 

 

 

या काळात ग्रामीण भागात शेतवाडीत शिवारात अनेक मटण पार्ट्या होत आहेत अशीच एक पार्टी वडगांव शिवारात आयोजित करण्यात आली होती तिथं नेमकं पोलीस रेड झाली मग वाटे घालणाऱ्यांची तारांबळ उडाली.लॉक डाऊन काळात मटण खायची बऱ्याच जणांना फार इच्छा होत आहे. वडगाव मधील काही जणांनी सात हजारला बकर आणले. बकर कापून वाटे केले.नंतर मूंडी,डोके,फेर तिथेच शिजवून खायचा बेत झाला.
मसाला,भांडीकुंडी घेऊन वडगाव शिवारात गेले एका झाडाखाली बकर मारल वाटे घातले नंतर त्यातील कांही भाग शिजवण्यासाठी ठेवणार तेवढ्यात पोलीस आले.त्यांच्या हातातील लाठ्या पाहिल्यावर आता काय आपली धडगत नाही हे समजले.

त्यातील दोघाचौघानी दारुही ढोसली असल्याने मोठे धाडस दाखवत इतर मीत्रानां म्हणत होते.ये थांबारे त्यांना आंम्ही सांगतो मग ते जातात म्हटले.त्यातील न पिलेले काही युवक जरा दुरच थांबले आणी दारु ढोसलेले मात्र पोलीसांना अविर्भावात काय तरी सांगायला गेले.पोलीस सुध्दा लॉकडाउन काळात कांही करायच नाही घरीच बसायच अशी शासनाची शिफारस असताना तुम्ही अशी कांम करता म्हणून लाठीचा प्रसाद दिला.

लाठ्या बसल्यावर दारु उतरली आणी सर्वजण सैरावैरा पळाले. घातलेले वाटे,भांडी,मसाला इतर सर्व सोडून वाटे घालणाऱ्यांनी धूम ठोकली.पोलीस जागेवर गेले आणी तेथील सर्व साहित्य गोळा करुन घेऊन गेले असे म्हणतात पण नक्की काय झाल हे पहाण्यासाठी सुध्दा तिथे कोणी थांबले नव्हते.

पहात थांबलेल्यानां नसती पीडा अंगावर नको म्हणून त्यानीही धूम ठोकली.पण त्या सर्व वाट्यांच,भांड्याच व इतर सामानाच काय झाल ते मात्र कळाल नाही. पण वाटे घालून मटण खाण्याची हौस बाळगलेल्या युवकांना मात्र वाटे महागात पडले हे मात्र नक्की.या प्रकरणाची लोक मात्र चवीने चर्चा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.